शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील दुष्काळजन्य स्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:17 IST

महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप’द्वारे तीन टप्प्यात दुष्काळसदृश तालुक्यांचे सर्वेक्षणदुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.

कोल्हापूर : महाराष्टतील दुष्काळसदृश स्थितीची पाहणी करण्यासाठी राज्य सरकारने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याद्वारे केंद्राने ठरवून दिलेल्या तीन टप्प्यातील निकषांची पाहणी करण्यात येत आहे. त्यानुसार सलग २१ दिवस पाऊस न पडलेल्या २०० तालुक्यांचे सर्वेक्षण सुरू आहे, हे तिन्ही टप्प्यांतील सर्वेक्षण २५ आॅक्टोबरपर्यंत पूर्ण होऊन ३१ आॅक्टोबर रोजी राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती जाहीर केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात एका कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, महाराष्टÑात काही ठिकाणी समाधानकारक तर काही ठिकाणी असमाधानकारक पाऊस झाला आहे; त्यामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे; पण हे नुकसानग्रस्त भागांची तपासणी करण्यासाठी महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘अ‍ॅप’ची निर्मिती केली असून, त्याचे मुंबईत शुक्रवारीच उद्घाटन झाले.

या ‘अ‍ॅप’द्वारे महाराष्टÑात पडलेल्या पावसाचे गाव, मंडल, तालुका व जिल्हानिहाय मोजमाप करण्यात येत आहे. सलग २१ दिवस ज्या तालुक्यात पाऊस पडत नाही, असे तालुके संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात येत आहेत, अशा राज्यातील २०० तालुक्यांत २१ दिवस पाऊस पडला नसल्याने केंद्राच्या निकषांप्रमाणे त्यांचा संभाव्य दुष्काळसदृश यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.

या दुसऱ्या टप्प्यातील पाहणी सुरू करण्यात येत आहे. त्या पाहणीत त्या-त्या भागातील पर्जन्यमान, भूजल पातळी, जमिनीची आर्द्रता, पिकांची स्थिती यांचे उपग्रहामार्फत सर्वेक्षण सुरू केले आहे. याशिवाय निवडलेल्या तालुक्यांची तिसºया टप्प्यात प्रत्यक्ष पाहणी करून दि. २५ आॅक्टोबरपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून दुष्काळजन्य परिस्थिती ३१ आॅक्टोबरपर्यंत जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर दुष्काळग्रस्त भागांना तातडीने मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर